Murder: मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईला संपवले
Murder Case: टोमणे, शिव्या देण्याच्या रागातून कायमचे संपविले.
अहेरी |जि. गडचिरोली: येथील जुन्या तहसील कार्यालयामागील एका झोपडीवजा घरात राहणाऱ्या महिलेची तिच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने टॉवेलने गळा आवळून हत्या केली. निर्मला चंद्रकांत आत्राम (४९) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मुलगी आणि तिचा प्रियकर यांना ताब्यात घेतले आहे.
निर्मला यांची मुलगी उर्मिला (२२) हिचे मागील ४ वर्षापासून रूपेश येनगंधलवार (२३) या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. वडील नसल्याने उर्मिलाचा सांभाळ तिच्या आईनेच केला होता; पण अलीकडे मुलीच्या प्रेमप्रकरणावरून मायलेकींचे पटत नव्हते. आईचे टोमणे मारणे, प्रसंगी शिव्या देणे उर्मिला हिला सहन होत नव्हते. यातूनच तिने प्रियकर रूपेशच्या मदतीने गुरुवारी रात्री ११ वाजता आईचा टॉवेलने गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर ते दोघेही अहेरीतच रूपेशचा मित्र निखिल खोब्रागडे याच्या खोलीवर गेले. मात्र, घटनेबद्दल त्यांनी रूपेशला काहीही सांगितले नाही. पहाटे ३ वाजेच्या सुमारास रूपेशने उर्मिला हिला तिच्या घरी सोडून देण्यास मित्र निखिलला सांगितले. ते बाइकने जात असताना वाटेतच गस्तीवरील पोलीस भेटले आणि हा घटनाक्रम उघडकीस आला.
वडिलांची झाली होती नक्षलींकडून हत्या
उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २००० मध्ये अर्कापल्ली गावात त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेथून पाचव्या दिवशी उर्मिलाचा जन्म झाला. तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले होते. आई निर्मला प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात मानधन तत्त्वावर कार्यरत होती. जन्मापासून वडिलांचे छत्र हरपलेल्या आपल्या मुलीचा सांभाळ त्यांनी खूप कष्टाने केला होता. भविष्यात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती; पण क्षुल्लक कारणातून जन्मदात्या आईची हत्या केल्याने तिला गजाआड जावे लागले.
Web Title: girl murder her mother with the help of her boyfriend