व्यापारी गौतम हिरण हत्याप्रकरण असा रचला कट, दोषारोपपत्र दाखल
श्रीरामपूर | Murder Case:राज्यात गाजलेले बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण हत्याप्रकरणात पाच आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी अपहरण व खून केल्याचे सुमारे साडे पाचशे पानाचे दोषारोपपत्र आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला. त्यानंतर तपास करीत पाच आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हा करण्यासाठीचे वापरण्यात आलेले साहित्य कार, मोटारसायकल जप्त करण्यात आले. तपास करताना साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर पाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
अजय राजू चव्हाण (वय २६ ), नवनाथ धोंडू निकम (वय २३), आकाश प्रकाश खाडे (वय २२), संदीप मुरलीधर हांडे (२६), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय२५) यांच्याविरुद्ध डीवायएसपी संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
२७ फेब्रुवारी रोजी ढग्याचा डोंगर ता. सिन्नर येथे या गुन्ह्यातील आरोपींनी एकत्र येत गौतम हिरण यांचे अपहरण केले. नंतर त्यांना ठार करून त्याच्या जवळील रोख रक्कम लंपास करण्याचा कट रचला. या आरोपींनी योजनाबद्ध पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले.
Web Title: Gautam Hiran murder case plotted like this