घरगुती गॅस सिलिंडर महागला, सर्वसामान्यांना जोराचा झटका
Gas Cylinder Price Hike: पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. सिलींडरच्या दरात २५ रुपयांनी महागले असल्याने सर्वसामान्यांना चांगलाच झटका बसला आहे. पेट्रोल, डिझेल वाढत्या किमतीबरोबरच गॅस सिलिंडर दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले जात आहे. मात्र सरकार सर्व आंतरराष्ट्रीय किमतीवर ढकलून देत आहे.
घरगुती गॅस सिलिंडर १४०.२ किलोच्या एलपीजी (LPG Price) सिलिंडर दर दिल्लीत व मुंबई येथे ८५९.५ झाला आहे. कोलकत्ता दर ८८६ रुपये, लखनौ ८९७.५ एवढे दर झाले आहेत. १ जुलै ला तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडर दर २५ रुपयांनी वाढविले होते. १ ऑगस्टला व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात ७३.५ रुपयांची वाढ केली होती.
Web Title: Gas Cylinder Price Hike in august