Bhiwandi Gang Rape News: भावाला मारहाण करून बहिणीला रात्रीच बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार (abused) केल्याची घटना.
भिवंडी : भावाला मारहाण करून बहिणीला रात्रीच बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शांतीनगर परिसरातील फातमानगर परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणी शेलार येथे आतेबहिणीकडे गेली होती. रात्री तिला भावाचे १५ मिसकॉल आले होते. १२ वाजता भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी भावाने, ‘माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये’ असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी ओळखीच्या रिक्षाचालकासोबत बागे फिरदौस येथे आली. तेथे दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू त इतर दोन जण (सर्व रा. फातमानगर) यांनी पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षाचालकास मारहाण केली.
ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला
मारहाण केल्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपांत पीडितेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी इतक्यावर थांबले नाहीत. त्यांनी तिला पुन्हा फातमानगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकावून सोडून पसार झाले. या घटनेनंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला.
Web Title: Gang rape of young woman