Home महाराष्ट्र विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली मांत्रिकासह तिघांचा सामूहिक बलात्कार

विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली मांत्रिकासह तिघांचा सामूहिक बलात्कार

Breaking Sangli Crime News:  धक्कादायक गोष्ट म्हणजे या विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि मांत्रिकाने अर्जुनवाड (ता. शिरोळ) याठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर.

Gang-rape of married woman by three including witch doctor in the name of purification

सांगली: सांगलीमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाळी एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मूल होत नाही या अंधश्रद्धेला बळी पडत एका विवाहित महिलेच्या तिच्याच सासरच्या व्यक्तींनी शारीरित आणि मानसिक छळ केला असल्याचं समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि मांत्रिकाने अर्जुनवाड (ता. शिरोळ) याठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याची विश्रामबाग पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या गंभीर घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात देखील खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  पंढरपूर तालुक्यामधील एका तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी लग्न झालं होतं. यानंतर त्या तरूणीला मूल होत नसल्यामुळे तिचा छळ करण्यास सुरुवात केली गेली. यामध्ये कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेलं होतं. यानंतर घरात सतत बुवा किंवा महाराज यांना घरी बोलवलं जात होतं. या अंधश्रद्धेच्या आहारी तिला बुवाचे पाय धुवून पाणी प्यायला लावण्यात आलं. विश्रामबागेतील घरी तसेच अर्जुनवाडमधील मंदिरात या तरूणीचा छळ सुरू होता. काही काळापूर्वी या तरूणीचं संपूर्ण सासरचं कुटुंब गाडीतून निघालं असता वाटेत त्यांची गाडी बंद पडली. यावेळी सासरच्या मंडळींनी अर्जुनवाडमधील बुवा काशिनाथ उगारे याला फोन केला. यावेळी या कथित बाबाला संपूर्ण हकीकत सांगण्यात आली. त्यावेळी या बाबाने पीडितेच्या कुटुंबीयांना तुमची सून अपशकुनी असून तिचं शुद्धीकरण करावं लागेल, असं सांगितले.

यावेळी दुसऱ्याच दिवशी त्यांनी धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे बुवा उगारे पीडित तरुणीच्या घरी आला. यावेळी पूजापाठ झाल्यानंतर तरुणीस अंघोळ करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि बुवा काशिनाथ यांनी या तरूणीवर बलात्कार केला.

या संपूर्ण प्रकारानंतर ही तरूण माहेरी गेली आणि काही दिवस रडतच होती. अखेर तिच्या आईने सतत याबाबत विचारणा केल्यानंतर तिने घडलेली कहाणी सांगितली. त्यामुळे माहेरच्या मंडळींना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये आता जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि बुवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, दीर, बुवा काशिनाथला अटकही करण्यात आली आहे.

Web Title: Gang-rape of married woman by three including witch doctor in the name of purification

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here