Home संगमनेर संगमनेर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

संगमनेर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Breaking News | Sangamner Crime: अमरधामच्या आडोशाला दरोड्याच्या उद्देशाने तयारीत असलेली चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार. चोरट्यांकडून चाकू, कोयते, दांडक्यासारखे घातक हत्यारे जप्त

gang preparing to commit a robbery is jailed

संगमनेर: संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. चेन स्नॅचिंग, लुटमार, दुचाकी चोरी याबरोबरच घरफोड्यांनी कहर केला आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोऱ्या रोखण्याचा प्रयत्न करीत असताना आज बुधवारी पहाटे साडे चारच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अमरधामच्या आडोशाला दरोड्याच्या उद्देशाने तयारीत असलेली चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी टाटा मान्झा कार त्याचबरोबर कोयता, चाकू, लाकडी दांडके, लोखंडी पक्कड, मोबाईलसह चोरीचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे.

संगमनेर शहर परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमिवर पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक रात्री वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालत आहेत. आज बुधवारी पहाटे अशीच गस्त घालत असताना नाशिक-पुणे मार्गावरील अमरधामच्या बाजूला एक सिल्व्हर रंगाची टाटा मान्झा गाडी एम एच 02 बी झेड 5223 उभी होती. त्या गाडीत काहीजण संशयास्पदरित्या बसलेले व त्या ठिकाणी वावरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांची शंका बळावल्याने त्यांची गाडीची तपासणी केली असता त्यात लोखंडी गज, कोयता, चाकू, लाकडी दांडके, पक्कड असे दरोड्याचे साहित्य आढळून आले त्यामुळे या पथकाने तातडीने या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत सहा दरोडेखोरांपैकी दोन पसार झाले तर चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पकडलेले आरोपी बबलू अनिल काळे, आंबेडकर नगर, ता. राहाता, गणेश गोरक्षनाथ दरेकर, रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, नाशिक, साई संजय शिरसाठ, रा. आंबेडकर नगर, राहाता, संस्कार राजेंद्र विखे, रा. दहेगाव, ता. राहाता यांना ताब्यात घेण्यात आले असून रितेश सदाफळ, रा. राहाता, बुट्या सदाफळ, रा. राहाता हे दोघे फरार झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पो. काँ. हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून सदर चोरट्यांवर गु.रजि.नं. 514/2024 भादवी कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. पवार करीत आहेत.

Web Title: gang preparing to commit a robbery is jailed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here