संगमनेर: तृतीयपंथीयांचा वेश परिधान करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
Sangamner Crime: दरोडेखोर तृतीयपंथीयांचा वेश परिधान करून दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
संगमनेर: दरोडेखोर तृतीयपंथीयांचा वेश परिधान करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीला शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास शहरातील पावबाकी रोड परिसरात ताब्यात घेतले आहे.
संजय मारुती शिंदे (वय 25, रा. चिसखेड, ता. भोताळा, जि बुलठाणा), ओकांर शंकर शेगर (वय 23, रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), सुनिल बाबुराव सांवत (वय 32, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), राजेश शंकर शेगर (वय 25, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), साजन शिवलाल चव्हाण (वय 25, रा. टाकळी तलाव, पोस्ट ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), किशोर महादेव इंगळे (वय 21, रा. टाकळी तलाव, पोस्ट ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संगमनेर शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी पावबाकी रोड परिसरात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्वरीत आपल्या सहकारी कर्मचार्यांना याबाबत माहिती देऊन पावबाकी रोड परिसरात पाठवले. या ठिकाणी एक कार संशयास्पदरीत्या त्यांना आढळली. पोलिसांनी या कारची तपासणी केली असता, या गाडीत 6 जण तृतीयपंथीयांचा वेश परिधान करून बसलेले होते.
या वाहनांमध्ये लोंखडी टॉमी, लाकडी दांडे, मिचरी पुड, लोंखडी गज अशी हत्यारे आढळली. हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना त्वरीत ताब्यात घेतले. पोलिसांनी दरोडेखोरांची राखाडी रंगाची कार (क्रमांक नंबर एम. एच. 01 बी. बी. 3863) 2 लाख 50 हजार रुपये किमतीची, दोन फूट लांबीची टॉमी अडीच ते तीन फूट लांबीचा लाकडी बांबू, तीन मोबाईल, 3150 रुपये रोख रक्कम, असा एकूण 2 लाख 83 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 577/2023 भारतीय दंड संहिता कलम 399, 402 प्रमाणे दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे.
Web Title: gang preparing to commit a robbery disguised as a third Party jailed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App