संगमनेर: दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद
Sangamner News: एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या (Arrested) टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.
संगमनेर: दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात संगमनेर शहर पोलीस पथकाला यश आले आहे. एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नव्या निरीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी उचललेली पावले कोतुकास्पद ठरली आहे. नवीन निरीक्षक मथुरे आपल्या कामाची छाप पाडण्याची कौतुकास्पद कामगिरी करीत आहे.
सिन्नर आणि संगमनेरमधून या मोटारसायकलींची आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले. या आरोपींकडून पोलिसांनी आत्तापर्यंत सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहे. अल्पवयीन बालकासह सुमित संजय कदम (रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर), मोबीन मुबारक शेख व महंमद फरदिन नाजिर शेख, (दोन्ही रा. रेहमतनगर, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी यासंदर्भात गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक भगवान मधुरे यांना सूचना केल्या होत्या. मधुरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक भोर यांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस कर्मचारी फुरखान शेख, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर शहर पोलीस ठाण्याचे अमित महाजन, दत्तू चौधरी यांचे पथकाला सोबत घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. ओम दीपक जानमाळी (रा. नाशिक. हल्ली संगमनेर) यांच्या चोरी गेलेल्या दुचाकीचा शोधा दरम्यान पथकाला एका अल्पवयीन दुचाकी चोरासंदर्भात संदर्भात माहिती मिळाली. या अल्पवयीन आरोपीकडे चौकशी केली असता दुचाकी चोरीचे कबुली दिली असून हे प्रकरण उघडकीस आले आहे. चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे.
Web Title: Gang of two-wheeler thieves Arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App