Home महाराष्ट्र कर्जतमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट! चौघे बुडाले, एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

कर्जतमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट! चौघे बुडाले, एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

Karjat: कर्जतमध्ये १० दिवसांच्या गणेश विसर्जनाला गालबोट, चांधई येथे उल्हास नदीत चौघे बुडाल्याची (drowned) घटना.

Ganesh immersion in Karjat cheeky! Four drowned, one dead

मुंबई:  कर्जतमध्ये १० दिवसांच्या गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. चांधई येथे उल्हास नदीत चौघे बुडाल्याची घटना समोर आल आहे. यामधील एका जणाला वाचवण्यात यश आलंय, तर एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

चांधई येथे उल्हास नदीत गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोक येत असतात. काहीजण गणपतीला घेऊन पाण्यात उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चारजण बुडाल्याची घटना घडली.

अपघातग्रस्तांचा मदतीसाठी बचाव पथकाने रात्री ९ पर्यंत बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने त्याला यश आले नाही तसेच ही शोध मोहीम सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चांधई येथील उल्हास नदीच्या पुलाजवळ गणेश विसर्जन करताना चेतन सोनवणे, यश साहू, जगदीश साहू, रोहन रंजन जेना (वय १२) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी रोहनचे वडील यांनी पाण्यात उडी मारत त्याला बाहेर काढले. तोवर हे तिघे दिसेनासे झाले. दरम्यान चेतनच्या घरच्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे नदीवर उपस्थित असलेल्या स्थानिकांपैकी काही मुलांनी बचाव करण्यासाठी नदीत उडी मारली.

बिग ब्रेकिंग. बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप

यश साहू भेटल्याने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र तो हालचाल करत नसल्याने त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करून देखील तो हालचाल करत नसल्याने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान चेतन सोनावणे व जगदीश साहू हे बेपत्ता असल्याने तत्काळ कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली.

अंधार आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने रेस्क्यु ऑपरेशन आजपुरते थांबवण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बेपत्ता असल्येलांचा शोध बचाव पथक घेणार आहे.

Web Title: Ganesh immersion in Karjat cheeky! Four drowned, one dead

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here