संगमनेर घटना: सख्या चुलत बहिणीवर अत्याचार, गरोदर राहिल्याने घटना उघडकीस
Sangamner Crime News: एकत्र कुटूंबातीलच १७ वर्षाच्या चुलत बहिणीवर वारंवार बलात्कार (rape) केल्याचे व त्या संबंधातून ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. २० वर्षीय चुलत भावाने आपल्या एकत्र कुटूंबातीलच १७ वर्षाच्या चुलत बहिणीवर वारंवार बलात्कार केल्याचे व त्या संबंधातून ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात समोर आली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोलमजुरी करून एकत्र कुटूंब चालविणाऱ्या दोन भावंडाच्या कुटूंबात ही धक्कादायक घटना घडली असून वीस वर्षाच्या भावाने आपल्या सतरा वर्षाच्या बहिणीला भुरळ घालत काही महिन्यापासून तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. मुलीचे पोट वाढल्याने आईच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे पिडीतेला तातडीने लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे पुढील तपास करत आहेत.
Web Title: friend’s cousin was Raped the incident came to light after she became pregnant
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App