Rape | धक्कादायक: महिलेच्या घरच्यांना धमकी देत वारंवार बलात्कार
पिंपरी | Pimpri: महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शरीरिक संबंध केले. त्यानंतर शारीरिकसंबंधबाबत फिर्यादीच्या घरच्यांना धमकी देऊन वारंवार बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर कोर्ट लग्न करावयाचे ठरल्यावर आरोपीने स्वतःच्या मनाप्रमाणे वस्तू घेऊन स्वतःकडेच ठेवल्या आणि तिची फसवणूक केली.
सदर प्रकार रावेत येथे ९ जानेवारी २०२२ रोजी घडला. याप्रकरणी पिडीत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंद्रनील आलोक बोस वय २९ रा. उंड्री सासवड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शाररिक संबंध (Sexual Relation)प्रस्थापित केले व घरच्यांना याबाबत सांगेन अशी धमकी दिली. त्यानंतर कोर्ट लग्न करण्याचे ठरल्यावर आरोपी फिर्यादीच्या बहिणीच्या मनाप्रमाणे वस्तू खरेदी करून स्वतः कडेच ठेवत फसवणूक केली.
Web Title: Frequent rape threatening the woman’s family