लाडक्या बहिणींना एसटी फुकट, महिन्याला ३ हजार, कॉंग्रेसकडून मोठी घोषणा
Maharashtra Assembly Elections 2024: महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध.
Rahul Gandhi: राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बसप्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज महायुतीचा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय.
महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
- शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
- जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील
- 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
- बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.
Web Title: Free ST for beloved sisters, 3 thousand per month Assembly Elections congress
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study