धक्कादायक! मानलेल्या भावाकडून चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार
Breaking News | Pune Crime: मानलेल्या भावाने चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : मानलेल्या भावाने चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महिलेच्या फिर्यादीनुसार, एका ३५वर्षीय तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने आरोपीला भाऊ मानले होते. त्याचे महिलेच्या घरात नेहमी यायचा. रविवारी सकाळी महिला आणि तिचे पती घरात नव्हते. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी चार वर्षांच्या बालिकेला घरातून बाहेर घेऊन गेला. त्यावेळी बालिकेची मोठी बहीण घरात होती. तिने त्याला विरोध केला. त्यानंतर त्याने घोरपडीतील लोहमार्गाजवळ बालिकेवर अत्याचार केला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मुलीला तातडीने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. बालिकेवर अत्याचार करून आरोपी पसार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
Web Title: Four-year-old niece molested by brother-in-law
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study