Home नाशिक मोहदरी घाटात चार वाहनांचा अपघात

मोहदरी घाटात चार वाहनांचा अपघात

Sinner Accident:  नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटातील वळणावर चार वाहनांचा अपघात झाला.

Four vehicle accident at Mohdari Ghat

सिन्नर: काल संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटातील वळणावर चार वाहनांचा अपघात झाला आहे.

दरम्यान मोहदरी घाटातील वळणावर आयशर टेम्पो क्रमांक MH 09 CU 6781 ने पुढे चालणाऱ्या बलेनो कार क्रमांक MH03 CS 2359 ला धडक दिली व आयशर टेम्पो खोल दरीत कोसळला तर त्या पाठोपाठ दुधाचा टँकर क्रमांक MH 17 BD 6999 ने टोइंग गाडी नंबर क्रमांक MH 15 GV 4174 ला धक्का देत दुधाचा टँकर पलटी झाला. टँकर मधील दूध वाहून गेल्याचे वृत्त आहे.

सदर अपघातात चारही वाहनांचे चालक अत्यंत किरकोळ जखमी झालेले आहेत. रात्र असल्यामुळे खाली दरीत गेलेला आयशर टेम्पो हे काढणे शक्य नसून बलेनो कार व दूध टँकर यास सरळ करून रोडचे कडेला सुव्यवस्थेत केले असून टँकर उचलण्याचे काम सुरु आहे. नासिक कडून ते सिन्नर बाजूकडे चालणारी वाहतूक ही धिम्या गतीने सुरु असल्याचे समजते.

Web Title: Four vehicle accident at Mohdari Ghat

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here