Home अकोले अकोलेतील चार भावंडं हरवली, नेमकं काय घडलं?

अकोलेतील चार भावंडं हरवली, नेमकं काय घडलं?

Breaking News | Akole: आदिवासी जोडप्याच्या चार मुलांचे अपहरण झाल्याची अफवा.

Four siblings from Akole went missing, what exactly happened

अकोले:  शहरानजीक माळीझाप उंचखडकदरम्यानच्या ओढ्यालगत नवनाथ मंडलिक यांच्या शेतात काम करणाऱ्या एका आदिवासी जोडप्याच्या चार मुलांचे अपहरण झाल्याची अफवा पसरली, परंतु काही वेळातच एका वाटसरू मोटरसायकलस्वाराने हे चिमुकले भावंड सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केले. त्यामुळे ही भावंडे नेमकी हरवली होती की, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला, याचा तपास पोलिस करत आहेत.

औरंगपूर ते विठे रस्त्याच्या कडेच्या दुकानांच्या सीसीटीव्हीत हे चौघे भावंडं रमतगमत रस्त्याने चालताना दिसत आहेत. भयभीत झालेली मुलगी अज्ञात मोटारसायकलवाल्याने नेले व दूर सोडून दिले असे सांगते, पण ती आई वडिलांच्या भीतीपोटी असे म्हणतेय का? हे तपासात पुढे येईल. तूर्त संशयित मोटारसायकलस्वार अथवा व्यक्ती सीसीटीव्हीत दिसून येत नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

माळीझाप प्राथमिक शाळेत ही चिमुकली इयत्ता तिसरीत शिकते. दररोज आपल्या भावंडांबरोबर अंगणवाडीत व शाळेत येते. सोमवारी आई-वडील सकाळीच कामासाठी घराबाहेर गेले आणि चिमुकली मुलगी हातात कपड्याची पिशवीसह आपल्या भावंडांना घेऊन माळीझाप गावाच्या दिशेने निघाली. आई-वडील घरी आले. घरात मुले नाहीत. शाळेत तपास केला, तर शाळेत मुले नव्हती. मग एकच धावपळ उडाली. मुलांचे अपहरण झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी अकोल्यात पसरली. पालक गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. अकोले-राजूर रस्त्यावरील पुलवाडी-विठे घाटदरम्यान एका वाटसरूला ही मुले दिसली. त्याच्या कानी अपहरणाची वार्ता पोहचली होती. लगेच त्याने ही मुले आपल्या गाडीवरून माळीझाप येथे पोहोच केली. दरम्यान, अपहरण झाले की मुले भरकटली याचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले.

Web Title: Four siblings from Akole went missing, what exactly happened

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here