Shrirampur: श्रीरामपूरमध्ये चार कैद्यांना करोनाची लागण
श्रीरामपूर(Shrirampur): श्रीरामपूर तालुक्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. तुरुंगात करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन हादरले आहे.
तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच जाऊन आता दोनशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मंगळवारी एकाच दिवसात १९ रुग्ण आढळून आले. करोनाची रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. मंगळवारी शहरी व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या १९७ इतकी झाली आहे.
न्यायालयीन कोठडीतील चार कैद्यांना करोनाची लागण झाल्याने हादरा बसला आहे. आता सर्वच कैद्यांची करोना तपासणी करण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे. उर्वरित सर्वच कैद्यांची सरसकट चाचणी करण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी यांनी सांगितले आहे,
दरम्यान या कैद्यांना करोनाची लागण कशी झाली हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. या कैद्यांच्या संपर्कात अन्य कैदी आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Four prisoners infected with Corona in Shrirampur