Home Accident News अहमदनगर: एसटी-कार अपघातात चार ठार

अहमदनगर: एसटी-कार अपघातात चार ठार

Breaking News | Ahmednagar: भाविकांवर काळाचा घाला, एसटी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना.

Four killed in ST-car accident

श्रीगोंदा: चारचाकी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव हद्दीत शकनवारी दुपारी ३ वाजता घडली. मृत व जखमी सर्व श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजन एकादशीनिमित्त आळंदी येथे देवदर्शन करून माघारी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे पारगाव सुद्रीक गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात पारगाव सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (५५), पारगाव संचालक हरी तुकाराम लडकत (६०), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (५५), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (६०, रा. सर्व पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर कार चालक विठ्ठल गणपत ढाले (३६, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (७०), रोहिदास हरिभाऊ सांगळे (७२, रा. पारगाव सुद्रीक)  हे तीघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे ३४ नंबर चारीच्या बळणाला ओव्हरटेक करताना ईटोंका कार (क्र. एमएच १२ टि.वाय. ४३५२) व श्रीगोंदाकडून शिरूरला जाणारी एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ०८७३) यांच्यात समोरासमोर भिषण अपघात झाला. यात सुरूवातीला दोनजण जागीच ठार झाले तर दोनजणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ईरटीका गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे. तर एसटीत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवाशी सुखरूप आहेत. बेलबंडी पोलीस ब श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. मयतांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहे.

Web Title: Four killed in ST-car accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here