अहमदनगर जिल्ह्यात चार दिवस प्रतिबंधात्मक आदेश: जिल्हाधिकारी
अहमदनगर | Ahmednagar: जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार आगामी सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 17 एप्रिल, 2022 या दरम्यान अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती व ईस्टर संडे या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या कारणास्तव महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
अहमदनगर शहर व जिल्ह्यात १४ ते १७ एप्रिल दरम्यान सण- उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटनांतर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात यात्रोत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात, त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात 14 एप्रिल ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
Web Title: Four days restraining order in Ahmednagar district