अहमदनगर: टेम्पोखाली चिरडून माजी महिला सरपंचचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: भरघाव आयशर टेम्पोखाली चिरडून फलकेवाडीच्या माजी सरपंच रोहिणी फलके यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
शेवगाव: भरघाव आयशर टेम्पोखाली चिरडून फलकेवाडीच्या माजी सरपंच रोहिणी फलके यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी ४ वाजत फलकेवाडी फाट्याजवळ घडली.
शेवगाव-पाथर्डी राज्यमार्गावर फलकेवाडी फाट्यावर भरघाव येणाऱ्या आयशर टेम्पोने चिरडल्याने फलकेवाडीच्या माजी सरपंच तथा माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या भाचेसून रोहिणी अनिल फलके (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता घडली.
फलकेवाडी शेवगाव-पाथर्डी फाट्यानजीक राज्यमार्गालगत शेतजमीन मशागतीस असणाऱ्या मजुरांचे काम आटोपते झाल्यानंतर रोहिणी फलके रस्त्याच्या कडेला त्यांच्या एम.एच.१६ बी.जी. ४९५६ क्रंमाकाच्या
स्कुटीवर बसून त्यांचे पती अॅड. अनिल फलके यांच्या बरोबर गप्पा करीत असताना नगरहून पव्हिसी पाईप घेऊन जालना येथे जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत फळे व भाजीपाला वाहतूक वाहन आयशर टेम्पो ९एम.एच.२१ बी.एच.६५०५) वाहनाने रोहिणी फलके यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्या स्कुटीसह वाहनाखाली येऊन फरफटत गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अॅड. अनिल फलके थोड्याशा अंतरावर असल्याने ते बचावले.
घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत वाहन चालक माधव नबाजी मोटे (रा. पळसी, ता. परतूर, जि. जालना) यास पोलिसांनी अटक करून अपघाताचा गुन्हा दाखल केला.
Web Title: Former woman sarpanch dies after being crushed under a tempo
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study