Home ठाणे माजी आमदाराचे स्वीय सहायक यांची पत्नीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

माजी आमदाराचे स्वीय सहायक यांची पत्नीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

माजी आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम होते. त्यांनी आपली पत्नी हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Former MLA's personal assistant committed suicide

ठाणे : नंदकुमार ननावरे हे एका माजी आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. काही कारणास्तव त्यांनी स्वीय सहाय्यकाचे काम सोडले होते. नंदकुमार ननावरे हे आपल्या कुटुंबीयांसह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते.  दुपारच्या सुमारास त्यांनी आपली पत्नी उर्मिला हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारल्याने  दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर आशेळेपाडा परिसरात खळबळ उडाली आहे.

नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नी या दाम्पत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. नंदकुमार ननावरे हे पूर्वी दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते.

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे राहत होते. त्यांनी आज आपल्या पत्नीसह बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ननावरे दाम्पत्याने असा निर्णय का घेतला, याचा शोध पोलीस करीत आहे.

Web Title: Former MLA’s personal assistant committed suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here