Home अहमदनगर ब्रेकिंग: नगर जिल्ह्यातील या माजी मंत्र्याचे निधन

ब्रेकिंग: नगर जिल्ह्यातील या माजी मंत्र्याचे निधन

Former Minister Shankarrao Kolhe passes away

कोपरगाव | Former Minister Shankarrao Kolhe passes away:  माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब (वय ९४) वर्ष  यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने (Kopargaon) तालुक्यात शोककळा पसरली आहे, त्यांचा अंत्यवविधी आज साय ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.

माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला.

सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करून राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव  तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार  होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी कोपरगावच्या विकासाचे ७२९ तारांकित प्रश्न, २१ लक्षवेधी सूचना आणि ४० ठराव मांडले. १९८९ ते २००४ या काळात शंकरराव कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय निमशासकीय निधी उपलब्ध करून असंख्य विकासाची कामे मार्गी लावली आहेत.

शंकरराव कोल्हे यांनी विधिमंडळाची पायरी ही विकासाची पायरी मानत कोपरगावच्या विकासाचे प्रश्न विधिमंडळाच्या वेशीला टांगत सोडून घेतले. या सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली.

Web Title: Former Minister Shankarrao Kolhe passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here