Rape: पाच वर्षीय बालिकेवर तरुणाकडून बलात्कार, आरोपी फरार
Rape Case | भिवंडी: भिवंडीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने बलात्कार केला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून पोलीस या नराधमाचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत बालिका कुटुंबासह शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका चाळीत राहत असून आरोपी तरुण देखील तिच्या घराशेजारीच राहत आहे. तो एका लूममध्ये कामगार म्हणून काम करतो. रविवारी सकाळी चिमुरडी घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपीने बहाणा करून तिला घरात बोलावून दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने पिडीत अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर आईला अंघोळ घालण्यासाठी तिने सांगितले असता अंघोळ घालताना धककादायक प्रकार समोर आला. या बालिकेवर हा प्रकार घडल्याचे उघडकीस येताच पिडीतेच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून हा धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार नराधामावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्याची त्यास कुणकुण लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला अधिकारी सुप्रिया जाधव करीत आहे.
Web Title: Five-year-old girl rape by youth