Home बीड पाच हजारांची लाच, उपजिल्हाधिकारी निलंबित

पाच हजारांची लाच, उपजिल्हाधिकारी निलंबित

Breaking News | Beed Crime: ५ हजार रुपयांची लाच (Bribe) एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्वीकारताना २५ जानेवारी रोजी एसीबीने रंगेहात पकडले.

Five thousand bribe, Deputy Collector suspended

बीड : तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्वीकारताना २५ जानेवारी रोजी एसीबीने रंगेहात पकडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी सागरे या ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत असल्याने त्यांना

विभागीय आयुक्तांनी सेवेतून निलंबित केले आहे. बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रुपये एवढा मावेजा मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतु उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रुपयांची लाचही मागितली होती. संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ती रक्कम घेताना सागरे व अन्य एकास एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सागरे यांना २६ जानेवारी २.५५ वाजता अटक दाखवली होती. त्यानंतर सागरे यांना २ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर झाला होता. उपजिल्हाधिकारी सागरे या ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत होत्या. त्यामुळे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी सागरे यांना निलंबित केले.

Web Title: Five thousand bribe, Deputy Collector suspended

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here