Home बीड घरात घुसून गोळीबार, एक जण जखमी

घरात घुसून गोळीबार, एक जण जखमी

Breaking News | Beed Crime: आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Firing broke into the house, one person was injured

बीड : बीडमध्ये बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील आरोपीने बीड शहरातील पेठ भागातील घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये काही दिवसांपूर्वी बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे. मात्र जुन्या वादाच्या कारणावरून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर घरात घुसून करण्यात आलेल्या गोळीबारात विश्वास डोंगरे हे गंभीर जखमी असून त्यांना संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आले आहे.

दरम्यान या आधी देखील याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती असून बनावट नोटांच्या प्रकारणात हा आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे बीडचा बिहार झालाय, अस म्हणणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बनावट नोटा प्रकरणी आरोपी असणाऱ्या आठवले नामक कार्यकर्त्याने हा गोळीबार केल्याचे देखील समोर येत आहे. यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Firing broke into the house, one person was injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here