अखेर सात दिवसांनंतर आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह
Ahmednagar news: नाणे घाटातील दरीत शोध घेण्यासाठी सात दिवसांपासून ट्रेकर्स व वन विभागाचे पथक प्रयत्न, युवकाचा मृतदेह (Dead body) सापडला.
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील २४ वर्षीय युवक मनोज गोरख जठार हा गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होता. नाणे घाटातील दरीत शोध घेण्यासाठी सात दिवसांपासून ट्रेकर्स व वन विभागाचे पथक प्रयत्न करत होते. अखेर गुरुवारी (दि. १९) सकाळी अकरा वाजता त्या युवकाचा मृतदेह सापडला.
मनोज जठार हा गेल्या मंगळवारी घरातून निघून गेला होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नाणे घाटातील एका हॉटेलसमोर मोटारसायकल लावून तो कठड्याकडे गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तेथे त्याची मोटारसायकल सापडली होती. त्यानंतर लोणी व्यंकनाथ येथील अनेक तरुण घटनास्थळी गेले होते. वन विभाग व ट्रेकर्सच्या जवानांनी शोधमोहीम राबविली होती. गुरुवारी सकाळी अकरा वाजता लोणावळा येथील शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या जवानांनी मनोज जठारचा मृतदेह शोधून काढला.
Web Title: Finally, after seven days, the Dead body of ‘that’ youth was found
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App