अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसचा थरार, भीषण आग, बस जळून खाक
Aurangabad Ahmednagar Highway Burning Bus: बसला भीषण आग, बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी नाही.
औरंगाबाद: औरंगाबाद – अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसला आज सकाळी भीषण आग लागली आहे. ही बस नागपूर येथून आली होती. हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची बस आहे. बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे. बस मधील प्रवासी उतरले असल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील बाबा पेट्रोलपंपावर प्रवाशी उतरल्यानंतर डिझेल भरायला जात बस जात असताना ही थरारक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
Web Title: Aurangabad Ahmednagar Highway Burning Bus
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App