अखेर त्या प्रिन्सिपलवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे अखेर रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.
जामखेड : रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे अखेर रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर आज (शुक्रवारी) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे, की डॉ. मोरे यांनी पीडित मुलीस कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलावले. ऑफिसच्या अँटी चेंबरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे केले व विनयभंग केला.
दरम्यान, विद्यार्थी व जामखेडमधील विविध संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत.
डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या चार दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे देखील विद्यार्थ्यांसमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्ष जामखेड तालुका वकील संघ यांनीदेखील जाहीर पाठिंबा दिला आहे.
डॉ. मोरेंवर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात मागील वर्षीही कॉलेजमधील मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Web Title: Finally, a case of molestation was filed against that principal
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study