कोल्हार घोटी रोडचे खड्डे बुजवा अन्यथा खड्डा तेथे झाड अनोखे आंदोलन
Akole Movement: पहिल्याच पावसात रस्त्याचा खड्डा, प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता कोल्हार घोटी रोडवर पडलेल्या प्रत्येक खड्ड्यात वृक्ष रोपण करून अनोखे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपसभापती मारूती मेंगाळ (Maruti Mengal).
अकोले: अकोले तालुक्यातील जिल्हा हद्द वारंघुशी राजूर अकोले संगमनेर कोल्हार घोटी रोडचे काम होऊन वर्ष सुद्धा झाले नाही त्यात या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा खड्डा तेथे झाड असे अनोखे आंदोलन करण्याचा इशारा माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रसिध्दी पत्रकात द्वारे दिला आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की जिल्हा हद्द बारघुशी राजूर अकोले संगमनेर ( रा. मा. ५०) या रस्त्यांचे काम हायब्रीड अन्युटी अंतर्गत झालेले आहे या रस्त्याच्या कामाला कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. वारघुशी राजूर अकोले संगमनेर पर्यंत जितके वळणे केलेले त्यातील एकही वळण दुरुस्त’ नाही. रस्त्याच्या बाजूला गटार काढलेली नाही. या रस्त्याच्या कामाला वापरत असलेले मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे आहे. हे आम्ही वारंवार सांगत होतो वेळोवेळी आम्ही मोर्चे, आंदोलने, उपोषणे या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनात हे आणून देत होतो की या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे याची चौकशी करावी. मात्र प्रशासनाने या कडे दुर्लक्ष करत घाई गडबडीत हे काम करून घेतले आज अक्षरशः पहिल्याच पावसात या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे वाहने चालवायला मुश्किल झाले आहे. आधीच या रस्त्याच्या खड्यांमुळे अकोले तालुक्यातील अनेक युवकांचा निष्पाप बळी गेला असून पुन्हा या पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतात या साठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले आणि राजूर तसेच संगमनेर या विभागांकडून आपल्या हद्दीतील खड्डे तातडीने बुजून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अन्यथा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता कोल्हार घोटी रोडवर पडलेल्या प्रत्येक खड्ड्यात वृक्ष रोपण करून अनोखे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपसभापती मारूती मेंगाळ यांनी यावेळी दिला आहे.
Web Title: Fill the potholes of Kolhar Ghoti Road otherwise movement