Home अहिल्यानगर अहिल्यानगर: महिला वनरक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की

अहिल्यानगर: महिला वनरक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की

Breaking News | Ahilyanagar Crime: वन विभागाच्या क्षेत्रात बेकायदा गौण खनिज (मुरुम) उत्खननाबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने चौघांनी महिला वनरक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना.

Female forest guard abused and pushed

नगर: वन विभागाच्या क्षेत्रात बेकायदा गौण खनिज (मुरुम) उत्खननाबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने चौघांनी महिला वनरक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना नगर तालुक्यातील देहरेतील फॉरेस्टमध्ये रविवारी (दि.२७) दुपारी घडली.

याबाबत देहरे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत (वय ३४, रा. नगर) बांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वनरक्षक या फॉरेस्ट हद्दीमध्ये गस्त घालात असताना देहरे शिवारातील सर्वे क्रमांक १७१ मध्ये चौघेजण एक विना क्रमांकाचा डंपर व एक विनाक्रर्माकाच्या जेसीबीच्या साह्याने गौण खनिज (मुरूम) उत्खनन करून चोरी करीत असताना आढळून आले.

वनरक्षक राऊत यांनी त्यांना मुरुम उत्खनन करण्याचा परवाना आहे का? असे विचारले असता त्यांनी वनरक्षक राऊत यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणत उत्खनन केलेला मुरुम वाहनासह घेऊन चौघे पसार झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हर्षल शिंदे (पूर्ण नाव माहित नाही (रा. शिंगवे नाईक, ता. नगर), अंकुश जाधव (पूर्ण नाव माहित नाही, रा. देहरे) व अन्य दोन अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

Breaking News: Female forest guard abused and pushed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here