Home पुणे वाहनचालकांना अश्लील हावभाव, इशारे, महिलांच्या वेश्याव्यवसायवर कारवाई

वाहनचालकांना अश्लील हावभाव, इशारे, महिलांच्या वेश्याव्यवसायवर कारवाई

Breaking News | Ahilyanagar Crime: नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल.

obscene gestures, warnings and prostitution of women to drivers

पुणे : नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये (कलम ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई ज्योती हुलावळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला थांबतात. त्या अश्लील हावभाव करतात. तेथून जाणारे नागरिक, वाहनचालकांना इशारे करतात, अशा तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्या तीन महिलांविरुद्ध कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निंबाळकर तपास करत आहेत.

नवले पूल परिसरातील सेवा रस्त्यावर थांबून काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांना विशेषत : महिलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.

यापूर्वी पोलिसांनी नवले पूल परिसरात कारवाई करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले होते. कारवाई केल्यानंतर या भागात महिला काही दिवस थांबत नाहीत. त्यानंतर पुन्हा गैरप्रकार सुरू होतात. नवले पूल परिसरात थांबणाऱ्या महिलांमुळे वाहतुकीस अडथळा होतो, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.

Breaking News: obscene gestures, warnings and prostitution of women to drivers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here