डॉक्टर महिलेची विष प्राशन करून आत्महत्या
Breaking News | Solapur Suicide Case: एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना.
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे एका डॉक्टर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. डॉ. जयश्री प्रशांत गवळी (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. अलिकडेच सांगोला येथे डॉक्टर पतीसह उद्योगपती सासरा व सासूकडून झालेल्या छळाला वैतागून डॉ. ऋचा रूपनवर यांनी आत्महत्या केली होती. त्यास महिनाही उलटत नाही तोच, मोहोळजवळ अन्य दुस-या डॉक्टर महिलेने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.
पेशाने डॉक्टर आसलेले जयश्री गवळी आणि त्यांचे पती प्रशांत गवळी दोघेही मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर गावात गवळी हाॕस्पिटल या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. दुपारी घरात डॉ. जयश्री यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ पंढरपूरच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
Web Title: Female doctor commits suicide by consuming poison
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study