Home सांगली प्रेयसी सोबत सेल्फी घेताना प्रियकराचा बुडून मृत्यू

प्रेयसी सोबत सेल्फी घेताना प्रियकराचा बुडून मृत्यू

Breaking News | Sangli: कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना.

Boyfriend drowned while taking selfie with girlfriend

सांगली : सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली. प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. यावेळी प्रेयसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता. पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला तितक्यात बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला.

घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून, बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे. मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. आता सेल्फी काढत असताना तरुण बुडाण्याची ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Boyfriend drowned while taking selfie with girlfriend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here