धाकट्या मुलीचे हातपाय बांधून बापाचा मोठ्या मुलीवर अत्याचार | Rape
Crime News: धाकटीचे हातपाय बांधून वडिलाने मोठ्या मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची घटना.
अमरावती: शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अत्याचाराच्या तीन घटनांची नोंद २४ तासांमध्ये झाली. यात क्रौर्याची परिसीमा गाठत जाग्या झालेल्या धाकटीचे हातपाय बांधून वडिलाने मोठ्या मुलीवर अत्याचार केला. तिन्ही घटनांमध्ये पीडित मुली या अल्पवयीन आहेत. नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
पतीला सोडून पत्नी वेगळी राहायला गेल्यानंतर तीनपैकी दोन मुली पतीकडे, तर एक मुलगी पत्नीकडे होती. मजुरीचे काम करणाऱ्या वासनांध पित्याने सप्टेंबर २०२२ मध्ये निद्रावस्थेत असलेल्या मुलींपैकी मोठ्या मुलीची छेडखानी केली. त्याचवेळी धाकट्या मुलीला जाग आली. तिने परिस्थितीचे भान ठेवून पित्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परोपरीने समजाविले. मात्र, बापाने या धाकट्या मुलीचे हात-पाय बांधले आणि मोठ्या मुलीवर तिच्यासमोर अत्याचार केला. जीवे मारण्याच्या धमकीमुळे दोन्ही मुली घाबरल्या होत्या. धैर्य एकवटून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. आरोपी पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: Father Rape elder daughter by tying hands and feet of younger daughter
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App