अकोले: कृष्णवंती नदीचे पाणी आढळा खोऱ्यात आणावे, बिताका प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा करून उर्वरित कामाला सुरुवात करावी, नदी ओढे नाले,यांची पुनर्बांधणी करावी, बंधार्याची दुरुस्ती व्हावी, सांगवी धरणाच्या पाण्याच्या अवर्तानाच्या तारखा निश्चित असाव्यात, आढळा प्रकल्पातील गाळ उपसा करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आढळा कृती समितीच्या आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आढळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Website Title: Farmers’ Front in Akole