Home अहमदनगर शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Ahmednagar Suicide News:  एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Farmer commits suicide due to indebtedness

नेवासा | Nevasa:  तालुक्यातील भेंडा खुर्द येथील एका शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रावसाहेब दगडू नवले (वय 45) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  मयत रावसाहेब नवले यांनी शनिवार दि.31 डिसेंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही  तरी मयताच्या नातेवाईकांनी रावसाहेब नवले यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

रविवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी घटनेची माहिती समजताच कुकाणा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी भेंडा खुर्द येथे मयत रावसाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Farmer commits suicide due to indebtedness

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here