अहमदनगर: कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या- Suicide
Ahmednagar | Shrigonda Suicide News: बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजय रामदास करंजुले वय ४२ रा. पिंप्री कोलंदर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
करंजुले यांचा शेती बरोबर दूध व्यवसाय होता. दूध व्यवसायात कमी असलेला बाजारभाव आणि वाढलेला खर्च यात खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडता आले नव्हते. यातच शेतीचा देखील खर्च वाढत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत असतांना पाडळी रांजणगाव येथील सेवा सोसायटीच्या कर्ज, कॅनरा बँक शिरूर येथील कर्ज या सर्व कर्जाच्यासह खाजगी सावकाराचे कर्जाचा तगादा याला कंटाळून करंजुले यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
Web Title: Farmer commits suicide due to debt