अहमदनगर: व्हिडीओ काढून विहिरीत उडी घेऊन शेतमजुराची आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: माझ्या डोक्यावर कर्ज झाले असल्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून विहिरीत उडी घेऊन शेतमजुराने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
कोपरगाव : माझ्या डोक्यावर कर्ज झाले असल्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून विहिरीत उडी घेऊन शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २२) दुपारी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी येथे घडली. या घटनेने शोक व्यक्त होत आहे.
हिंगणी बंधाराजवळील विहिरीत सोमनाथ खंडू कदम (वय ४३, रा. धारणगाव कुंभारी, ता. कोपरगाव) येथील शेतमजुराने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (Ended life) केली.
आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ काढून नंतर विहिरीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. गावकरी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सोमनाथ खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
Web Title: farm laborer committed suicide by jumping into a well after taking a video
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study