गुणरत्न सदावर्तेविरोधात प्रसिद्ध वकिलाची एन्ट्री, मराठा आंदोलकांची केस एक रुपयाची फी न घेता लढणार
Maratha Reservation: प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी मोठा निर्णय घेतला, सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मराठा आंदोलकांची केस ते एक रुपयाची फी न घेता लढणार.
मुंबई: राज्यात मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा बुधवार पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज सकाळीच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड मराठा आदोलकांनी केली आहे. यावरून मराठा आंदोलक आणि सदावर्ते असा वाद चांगलाच रंगला आहे. गाड्यांची तोडफोड करणारे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. या घटनेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
यावरून सदावर्ते वि. जरांगे पाटील आरोप प्रत्यारोप सुरु असताना प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मराठा आंदोलकांची केस ते एक रुपयाची फी न घेता लढणार आहेत. यामुळे आता सदावर्ते वि. मानशिंदे अशी लढाई न्यायालयात पहायला मिळणार आहे.
सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जातात. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात बंद असलेला अभिनेता संजय दत्तच वकीलपत्र त्यांनी घेतले आणि ते चर्चेत आले. राम जेठमलानी यांच्याकडे देखील त्यांनी खूप वर्षे काम केलेले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केसेस ते लढवितात.
Web Title: famous lawyer against Gunaratna Sadavarte to fight the case of Maratha protesters
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App