प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय करताना अटक; स्टिंग ऑपरेशन करत केली कारवाई
Prostitution Business: वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि ग्राहकांना मॉडेल पुरवल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी २७ वर्षीय महिला कास्टिंग डायरेक्टरला अटक.
Prostitution Racket: वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि ग्राहकांना मॉडेल पुरवल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी २७ वर्षीय महिला कास्टिंग डायरेक्टरला अटक केली आहे.
आरती हरिश्चंद्र मित्तल (Aarti Mittal) असे आरोपीचे नाव आहे. ती चित्रपटांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करते. आराधना अपार्टमेंट, ओशिवरा येथे राहते.
सोशल सर्व्हिस ब्रांचने या प्रकरणाची चौकशी करून पुरावा म्हणून घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. या कारवाईत सोशल सर्व्हिस ब्रांचने दोन मॉडेल्सची सुटका करून त्यांचे पुनर्वसन केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरती मित्तल यांनी फोनमधील दोन्ही मॉडेल्सचे फोटो पीआय सुतार यांना पाठवले आणि सांगितले की दोन्ही मॉडेल्स जुहू किंवा गोरेगावमधील हॉटेलमध्ये येतील.
सुतार यांनी गोरेगाव येथील हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून दोन बनावट ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवले. मित्तल आपल्या दोन मॉडेल्ससह हॉटेलमध्ये पोहचल्या आणि त्यांना कंडोम दिले. आरतीच्या सर्व कृती स्पाय कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होत्या.
पोलिसांनी सांगितले की, आरती वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी मॉडेल्सना भेटायची आणि त्यांना चांगले पैसे देऊन फसवायची. मित्तलने अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले होते.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना मित्तल हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या गुप्त माहितीच्या आधारे पीआय सुतार यांनी एक टीम तयार केली आणि स्वतः ग्राहक बनून कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल यांना भेटले. सुतार यांनी मित्रांसाठी आरतीकडे दोन मॉडेल्सची मागणी केली. यासाठी आरतीने ६० हजार रुपये मागणी केली.
दरम्यान, सोशल सर्व्हिस ब्रांचने हॉटेलवर छापा टाकून आरतीला रंगेहात पकडले. याबाबत दिंडोशी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि एफआयआर नोंदवून आरोपी मित्तलला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, मॉडेल्सनी पोलिसांना सांगितले की, मित्तलने त्यांना प्रत्येकी 15,000 रुपये देण्याचे वचन दिले होते.
आम्ही आरतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास युनिट 11 क्राईम ब्रांचकडे ट्रान्स्फर करण्यात आला आहे.
Web Title: Famous Actress Arrested For Prostitution Sting Operation was carried
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App