Home पुणे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

Ravindra Mahajani Dead: अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. 

Famous actor Ravindra Mahajani was found dead

पुणे: सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते, देखणा आणि रुबाबदार नट, रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षाचे होते. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते.

ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता.   महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत.शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी सिनेमातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते, देखणा आणि रुबाबदार नट, रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षाचे होते.

तळेगाव दाभाडे येथील बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंत गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.

रवींद्र महाजनी यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास जाणवत होता. मावळमधील वातावरण मानवल्यामुळे ते गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मावळमध्ये राहायला आले होते. तळेगांव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात असलेल्या एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले.

फ्लॅटमध्ये गेले असता पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पडताळणी केली असता तो मृतदेह प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा असल्याचं आढळून आलं. महाजनी यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तळेगांव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी यांना कळविण्यात आली आहे.

Web Title: Famous actor Ravindra Mahajani was found dead

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here