अहमदनगर: झेरॉक्स दुकानात बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दोघांना अटक
Breaking News | Ahmednagar: झेरॉक्स दुकानातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दोन जणाविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. शासनाची फसवणूक करीत असल्याची घटना उघडकीस. ( two arrested).
शेवगाव | Shevgaon: शहरात झेरॉक्स दुकानातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दोन जणाविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तुळशीराम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप कचरू राऊत (संकेत झेरॉक्स, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), चैतन्य संतोष उन्हेघ (चैतन्य झेरॉक्स, रा. भडके मळा, शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. काळे यांच्या अधिपत्याखाली विवाह नोंदणी कक्षाचे कामकाज चालते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे व लिपिक सदाशिव कराळे यांना विवाह नोंदणीचे काम पाहणाऱ्या महानंदा जाधव यांना शेवगाव येथे बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. जाधव यांना सी. ए. बालवीर मोहन परदेशी यांच्याकडून याबाबतची माहिती मिळाली होती.
त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशाने जाधव यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात याबाबतचा तक्रार अर्ज दिला होता. त्यानुषंगाने चौकशीसाठी राऊत व उन्मेघ यांना ताब्यात घेतले असता, बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत असल्याचे समोर आले. त्यांनी असे प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Fake marriage registration certificate in Xerox shop, two arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study