Home संगमनेर पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गातील चार स्थानके वगळली, अंतिम आराखडा तयार

पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गातील चार स्थानके वगळली, अंतिम आराखडा तयार

Excluding four stations on Pune-Sangamner-Nashik railway 

संगमनेर | Pune-Sangamner-Nashik Railway : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील २४ स्थानकामधील ४ रेल्वे स्थानके वगळण्यात आली आहेत. संपूर्ण २३५ कि.मी. च्या अंतरात आता २० रेल्वे स्थानके राहणार असल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे आणि नाशिक या दोन महत्वाच्या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी गेल्या ३ दशकांपासून संघर्ष सुरु आहे. आता राज्यापाठोपाठ केंद्राकडूनही या प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाबाबत केंद्रसरकार सकारात्मक असल्याने येत्या काही दिवसांतच त्याला अंतिम मान्यता मिळेल असे संकेत मिळत आहे.

महारेलने या दोन मोठ्या शहरांच्या दरम्यान २४ स्थानकांची पाहणी करून त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. आता या रेल्वेमार्गावर २० स्थानके असणार आहेत.यापूर्वी असलेल्या स्थानकांच्या यादीमधील पुण्यातील कोलवडी, संगमनेर तालुक्यातील जांबूत, अकोले तालुक्यातील देवठाण, नाशिक जिल्ह्यातील दोडी हि स्थानके वगळण्यात आले आहे.

आता या रेल्वेमार्गावर पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, अंभोरे, संगमनेर, निमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर मूढारी, वडगाव पिंपळा, व नाशिक स्थानकांचा समावेश आहे. कामांमध्ये स्थानकांच्या परिसरातील इतर बांधकामासह, पादचारी पूल व मार्ग आणि त्या अनुषंगाने इतर कामानाही सुरुवात केली जाणार आहे.

Web Title: Excluding four stations on Pune-Sangamner-Nashik railway 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here