अहमदनगर: वीज वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला मारहाण
Breaking News | Ahmednagar Crime: वीजबील वसुलीसाठी गेलेल्या महावितरणाच्या पथकातील अभियंत्याला लाथाबुक्क्यांनी मारहण केल्याची घटना.
श्रीरामपूर: वीजबील वसुलीसाठी गेलेल्या महावितरणाच्या पथकातील अभियंत्याला शहरातील वॉर्ड क्र.१ मधील फातेमा हाउसिंग सोसायटी येथे लाथाबुक्क्यांनी मारहण केल्याची घटना घडली आहे.
सध्या महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू असून शनिवार दि. १६ मार्च रोजी थकीत वीजबिल
वसुलीसाठी महावितरणचे पथक शहरातील वॉर्ड क्र.१ मधील फातेमा हाउसिंग सोसायटी येथील श्री. शेख यांच्याकडे गेले होते. यावेळी शेख यांच्याकडील भाडेकरू असलेल्या आमीन अन्सारी याने तेथे येऊन आम्ही वीज बिल भरणार नाही, असे म्हणत वसुली पथकातील अभियंत्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी अभियंता प्रमोद केदारे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमीन अन्सारी याच्या विरोधात ३२३, ३५३, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
Web Title: engineer of Mahavitran who went to collect electricity was beaten up
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study