Home महाराष्ट्र Eknath Khadse: अखेर एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिट्ठी, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

Eknath Khadse: अखेर एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिट्ठी, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

Eknath Khadse leaves BJP

मुंबई( Eknath Khadse): भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढविण्यासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न केले. मात्र सध्याच्या काळात खडसेंना पक्षातून डावलले जात असल्याचे दिसून येत होत.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजप पक्षाचा त्याग केलेला आहे. ते शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील. राज्याचा अभ्यासू नेता, अनुभवी नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्षाला पाठबळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांनी १९८० साली भाजप कार्यकर्ता रुपात भाजपात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यास एकनाथ खडसे यांचा मोठा आहे.

एकनाथ खडसे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून दमदार कामगिरी केली आहे. लोकांच्या प्रश्नांवर सरकारला त्यांनी धारेवर धरले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Eknath Khadse leaves BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here