Home अहमदनगर साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू

साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू

Breaking News | Ahmednagar: साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील शिक्षकाचा भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना.

Teacher who came for Sai Darshan died in an accident

शिर्डी: साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे.

शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील शिक्षकाचा भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातून साई दर्शनासाठी ३ जुन रोजी शिक्षक मध्यरात्री आले होते. आलेल्या शिक्षकांपैकी दोन शिक्षक चारचाकी वाहन शासकीय गेस्ट हाऊसजवळ लावून दोघे जण गाडीत बसले होते.

तर शिवचरण मलेश आप्पा (वय ५४) व त्यांचा मित्र मोहन जाधव हे दोघे रोडवरून रूम बघण्यासाठी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या हिरो होंडा शाइन (एम एच २० जी ८०४४) या दुचाकीने मागून धडक दिल्याने मोठा रक्तस्राव होऊन शिवचरण मलेश आप्पा (वय ५४) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची फिर्याद मोहन जाधव (विजयनगर, कर्नाटक) यांनी शिर्डी पोलिसांत दिली.

या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी दुचाकी चालकच्या विरोधात मयत शिक्षकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. दुचाकीवर दोन तरुण होते, हे दोघे भरधाव वेगाने शिर्डीकडे येत असताना हा अपघात झाला आणि एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर आलेल्या तीन शिक्षकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मयत शिक्षकास स्थानिक नागरिकांच्या मदतीतून साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Teacher who came for Sai Darshan died in an accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here