संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर वाहनचालकाला मारहाण करून लुटले
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर घारगाव शिवारात एका वाहनचालकाला चौघांनी अडवणूक करून ९ हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्रे हिसकावून घेत (robbed) मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुधाकर विठोबा बुचडे रा. ओढा ता. नाशिक हे ओझरकडून गोव्याला मालवाहू वाहनातून टायर घेऊन चालले होते. नाशिक पुणे महामार्गावर घारगाव शिवारात आले असता चौघा अज्ञात चोरट्यांनी त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील ९ हजार रुपये रोख रक्कम आधारकार्ड, एटीएम, लायसन्स आदि कार्ड हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी वाहनचालक सुधाकर बुचडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. व्ही. खेडकर हे करीत आहे.
Web Title: Driver beaten and robbed on Pune-Nashik highway