Home संगमनेर संगमनेर: शाळेचा दरवाजा अज्ञाताने जाळला

संगमनेर: शाळेचा दरवाजा अज्ञाताने जाळला

Breaking News | Sangamner Crime: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञाताने जाळल्याने (burnt) खळबळ उडाली.

door of the school was burnt by an unknown person

आश्वी: संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञाताने जाळल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की शनिवार दि. ९ मार्च रोजी सकाळी येथील शिक्षक अर्जुन दातीर यांनी शाळेचा वर्ग उघडला असता त्यांना एका वर्गाचा दरवाजा जळालेल्या अवस्थेत दिसला. तसेच शाळेचे कंपाऊंड आणि गेट तुटलेल्या अवस्थेत होते. ही घटना तत्काळ गावातील नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वर्षे व उपाध्यक्षा कविता भोसले यांना कळवली. त्यानंतर सदर घटनेची माहिती आश्वी पोलिसांना दिली असता पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांसह पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सदर घटना सरपंच किरण गागरे यांना समजली असता त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि शाळेच्या तुटलेल्या कंपाउंड व गेटची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर कामाला सुरुवातही झाली. तसेच यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी सरपंचांनी दिले. याप्रकरणी मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: door of the school was burnt by an unknown person

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here