डॉक्टर पत्नीच्या अपघाताचा रचला बनाव, पतीनेच दगडाने ठेचून केला खून
Nashik Crime News: दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून केल्याची घटना.
नाशिक: नांदगाव तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहितेचा अपघाताचा बनाव रचत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीनं माहेरून घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये आणले नाही, या कारणावरुनच विवाहितेची हत्या झाल्याचा आरोप मयत महिलेच्या भावानं केला आहे. नाशिक हादरवणारी घटना घडली आहे. नाशिकमधील डॉक्टर महिलेच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे.
विवाहितेच्या भावानं याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. भावानं केलेल्या तक्रारीवरुन नांदगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भावानं केलेल्या तक्रारीनंतरच हे प्रकरण उघडकीस आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. भाग्यश्री शेवाळे असं मयत विवाहितेचं नाव आहे. गेल्या 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजेदरम्यान मन्याड फाटा परिसरात दुचाकी अपघातात न्यायडोंगरी येथील डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचा मृत्यू झाल्याची नोंद चाळीसगाव पोलिसांत करण्यात आली होती. घटनास्थळ नांदगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं सदर गुन्हा नांदगाव पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. पण घटनेला 15 दिवस उलटले आणि या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं.
घटनेच्या 15 दिवसांनंतर मृत डॉ. भाग्यश्री यांचा छत्रपती संभाजीनगर मध्ये वास्तव्यास असलेला भाऊ सचिन कैलास साळुंखे यांनं फिर्याद दाखल केली. त्यानुसार त्याची बहीण भाग्यश्रीकडे तिचे पती डॉ. किशोर शेवाळे आणि सासरे नंदू शेवाळे हे माहेरून घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सातत्यानं करत होते. भाग्यश्रीकडून मागणी पूर्ण न झाल्यानं डॉ. किशोर शेवाळे आणि नंदू शेवाळे यांनी भाग्यश्री यांचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: doctor faked the wife’s accident, the husband Murder her by crushing her with a stone
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App