Home पुणे धक्कादायक! शिक्षिका पत्नी व  दोन मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या

धक्कादायक! शिक्षिका पत्नी व  दोन मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या

DAUND: पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

doctor committed suicide by killing his wife and two children

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  चैताली पार्कमधील गंगासागर पार्कमध्ये मंगळवारी (दि. २०) दुपारी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली. त्यावरून पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नी व मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (४२), पत्नी पल्लवी (३५), मुलगा अद्वित (११), मुलगी वेदांतिका (७) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल दिवेकर हे जनावरांचे डॉक्टर आहेत. पत्नी पल्लवी या शिक्षिका आहेत. मंगळवारी दुपारी दिवेकर यांच्या बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना डॉ. अतुल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्यांची पत्नी पल्लवी खाली निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. यवत पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आढळली. त्यात मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला. मी आत्महत्या करीत आहे, असे डॉ. अतुल दिवेकर यांनी लिहिलेले होते.

चिठ्ठीत ज्या विहिरीचा उल्लेख केला होता. त्या ठिकाणी पाहणी करून पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. कौटुंबिक वादातून हे कृत्य हे घडल्याचे बोलले जाते.

पतीने पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. वरवंड येथील डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

डॉक्टर दिवेकर यांनी सुरुवातीला पत्नीचा खून केला त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहिरीत नेऊन टाकले आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुलांचा मृत्यूदेह सापडला नसून  त्यांचा शोध  ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत.

कौटुंबिक वादातून  प्रकार घडला का? किंवा कर्जातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही ठोस माहिती अजून समोर आली नाही. 

Web Title: doctor committed suicide by killing his wife and two children

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here