Home संगमनेर संगमनेर: धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले

संगमनेर: धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले

Breaking News | Sangamner Crime: महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने चोरल्याची घटना.

Dhumstyle extended the gold ornaments around the woman's neck

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मिरपूर शिवारातभरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने चोरल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजी भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. शहरात होणाऱ्या दागिने चोरीचे लोन आता ग्रामीण भागातही पसरू लागल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रंजना मारूती उंबरकर (वय ५६, रा.उंबरी बाळापूर) ही महिला मिरपूर शिवारातील एका पेट्रोल पंपापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनात येऊन बसत होत्या. याचवेळी दुचाकीवरून अज्ञात दोन चोरटे आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोन्याचे मोठे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण असे एकूण साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केला.

याप्रकरणी रंजना उंबरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते करत आहेतवाहनात येऊन बसत होत्या. याचवेळी दुचाकीवरून अज्ञात दोन चोरटे आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोन्याचे मोठे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण असे एकूण साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केला. याप्रकरणी रंजना उंबरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते करत आहेत.

Web Title: Dhumstyle extended the gold ornaments around the woman’s neck

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here